Login

"काय माझा गुन्हा...?" भाग ४५

सामाजिक

दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६


"काय माझा गुन्हा...?" भाग ४५



डेक्कन राणी एक्स्प्रेसची गाडी वेग घेत होती… आणि प्रत्येक किलोमीटरसोबत गौरवीचं मन अजूनच जड होत चाललं होतं…

स्वप्नं होती… पण त्यांना किंमत होती… आणि ती किंमत
आता दोघांनाही हळूहळू कळू लागली होती…

पुण्यात पोहोचल्यानंतर दोघेही माधव राहत असलेल्या भाड्याच्या घरात गेले... व तिथेच ते रात्र थांबले…

दोघांनीही प्रवासाचा थकवा होता, व मनावरचा ताण सुद्धा होता,
पण त्याहून जास्त एकमेकांसोबत असल्याची शांत व प्रेमळ जाणीव होती…

थोडं फ्रेश होऊन दोघांनी येताना खायला काहीतरी घेऊन आले ते त्यांनी रात्री खाल्लं आणि दोघेही एकमेकांच्या कुशीत शांत झोपी गेले...

दुसऱ्या दिवशी सकाळ होताच... दोघेही फ्रेश झाले... त्यानंतर सगळी तयारी वगैरे करुन... आणि मग सर्व आवरून ते दोघेही थेट कोर्टाकडे निघाले…

कोर्टाच्या पायऱ्या चढताना गौरवीचे हात थरथरत होते…
माधवने पटकन तिचा हात घट्ट धरला…
“आता मागे वळायचं नाही…” असं तो शांतपणे म्हणाला…

कोर्ट मॅरेजची नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली...
दोघांचीही कागदपत्रं..., दोघांचीही सही..., आणि साक्षीदार…
कोणताही गाजावाजा नाही… कोणतीही मिरवणूक नाही…
फक्त दोन स्वाक्षऱ्या आणि एक निर्णय... 'आयुष्य एकत्र घालवण्याचा…' आणि शेवटी दोघांनीही एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातली... आणि दोघेही एकदाचे लग्नाच्या बंधनात अडकली...

कोर्टाच्या पायऱ्या उतरून दोघेही बाहेर आले… दुपारचं ऊन अंगावर पडलं होतं…

पण त्या उन्हातही गौरवीला आज वेगळीच उब जाणवत होती…
ती क्षणभर थांबते…
हातातला मॅरेज रजिस्टरचा कागद तिने घट्ट पकडला होता…
जणू आयुष्याचा पुरावा जो होता…

तीच्या डोळ्यांत पाणी तरळत होतं… पण आज ते अश्रू
दुःखाचे नव्हते… ते हलकेपणाचे होते…, आनंदाचे होते...
एका मोठ्या ओझ्यातून मोकळं झाल्याचे…

“आपण खरंच पती-पत्नी झालो ना…?”
गौरवी हळूच, अगदी कुजबुजल्यासारखी माधवला विचारते…
तिच्या आवाजात अजूनही अविश्वास होता…

माधव तिच्याकडे पाहतो… आज तिच्या चेहऱ्यावर ती जुनी घाबरलेली गौरवी नव्हती… तर आज ती निर्णय घेणारी, स्वतःसाठी उभी राहिलेली स्त्री होती…

तो हलकंसं हसतो… आणि म्हणतो...
“हो…”
थोडं क्षणभर थांबून पुढे म्हणतो...
“आणि आता हे नातं कोणालाही नाकारता येणार नाही…”

हे ऐकताच गौरवीच्या ओठांवर हलकंसं हास्य उमटतं…
माधव तिचा हात आपल्या हातात घेतो… जणू सांगत असतो...
'आता तू एकटी नाहीस…'

तो हळूच तिच्या हातावर ओठ टेकवतो… क्षणभर वेळ थांबल्यासारखा वाटतो…

गौरवीच्या गालावर लाजेची गुलाबी छटा चढते… ती नजर खाली झुकवते… त्या नजरेत भीती नव्हती… तर नव्या नात्याची सुरुवात होती…

दोघेही चालायला लागतात… कोर्टाच्या आवारातून बाहेर…
गर्दीतून चालत… ते आयुष्याच्या नव्या वळणाकडे पाऊल टाकतात…

त्यांच्या या लग्नात कोणताही गाजावाजा नव्हता… कि कोणतेही कोणतेही फटाके नव्हते…

पण दोन मनं मात्र एकमेकांना आयुष्यभरासाठी बांधली गेली होती…




क्रमशः....

©® प्राची कांबळे (मिनू)


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."